Free YouTube Transcribe

Video transcript

Trip Vlog | Konkan Tourist Places | Beach Vlog | Konkan Tourism |Village Food| Beach Resort| Sukirtg

Sukirtg · 1,617 words · 8 min read

WhatsAppTelegramX

Want to search this transcript, jump the video from any line, or download it as TXT, SRT, or VTT?

Open in the transcript tool

Full transcript

0:00कोण म्हणतं फाईव्ह स्टार बीच विला फक्त

0:03गोव्यालाच

0:07मिळतो गोवा नाही केरळ नाही मालदीव नाही तर

0:10आपल्या कोकणात आम्हाला सापडला एखाद्या

0:12फाईव्ह स्टार हॉटेल किंवा स्पा

0:14रिसॉर्टच्या दर्जाचा मराठमोळा होमस्टे

0:17ज्याच्या वाईब्स म्हणजे फुल माहोल भाऊ

0:20इथून समुद्र पाच मिनिटांवर नाही तर पाच

0:23पावलांवर

0:27होता त्याचबरोबर इथून जवळ असणार लय भारी

0:30स्पॉट्स आम्ही बघितले जिथून जो काही

0:32व्ह्यू मिळालाय ना पूर्ण ट्रिपच वसूल

0:35तुम्हालाही तुमची उन्हाळ्यातली ट्रिप अशीच

0:37वसूल करायची असेल तर हे राहण्याचं

0:39इंटरेस्टिंग ठिकाण कोणतं इथून कोणकोणते

0:42ठिकाण तुम्ही एक्सप्लोर करू शकता हे सगळं

0:44व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ

0:46शेवटपर्यंत बघण्याचे कष्ट घ्या

0:51[संगीत]

1:00तर माझी पुतणी वेदा हिची दहावीची एक्झाम

1:02असल्यामुळे आम्ही वर्षभर एकत्र कुठेही जाऊ

1:04शकलो नव्हतो आणि आम्ही वाटच बघत होतो की

1:06कधी एकदा एक्झाम संपते आणि एकदाची परीक्षा

1:08संपली आणि आम्ही सगळेजण प्रथेप्रमाणे

1:11आलेलो आहोत कोकणात तर आपला सेगमेंट असतो

1:14की मला यांना विचारायचंय एका शब्दात उत्तर

1:16द्यायचंय की त्यांच्या मते आयडियल

1:18उन्हाळ्याची सुट्टी कोणती तर विचारूयात

1:21आपण पत्ते माझंच उत्तर सांगितलं दादानं

1:24मला पत्तेच सांगायचं होतं पाच तीन दोन

1:27राजा राणी चोर पोलीस वगैरे अशा सगळ्या

1:29गोष्टी खेळायच्या पत्त्यांमध्ये आता वेगळं

1:32म्हणजे पिंपरद मामाचं गाव तर वेधा बरोबर

1:36या व्यक्तीने वर्षभर लय कष्ट करून एसएससी

1:39ची एक्झाम फायनली दिलेली आहे त्यामुळे

1:42हिच्या सेलिब्रेशन साठी आपण आलेलो आहोत तर

1:44एका शब्दात उन्हाळ्याची सुट्टी आयडियल

1:46भटकंती आंबे ठाण्याचे वेत बरं बाय द वे

1:50तुमच्या मते आयडियल उन्हाळ्याची सुट्टी

1:52काय हे मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि

1:53ते सुद्धा एका शब्दातच माझ्या मते आयडियल

1:56उन्हाळ्याची सुट्टी एका शब्दात म्हणजे आईश

2:00क्या बोला तूने ॲश नाही आईश आई

2:06आवडत आवडत उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात

2:09आणि आम्ही तर एका वर्षांनी एकत्र लॉंग

2:12ट्रिप प्लॅन करत असल्यामुळे फुल आईश

2:14करण्याच्या उद्देशाने आम्ही निघालो

2:17पुण्याहून परत कोकणात

2:19गुहागरलाच गुहागरला ताम्हणीतूनही जाता

2:22येतं आणि सातारा उमरस पाटण चिपळूण

2:24मार्गेही जाता येतं यावेळी फुल सेलिब्रेशन

2:27मूड असल्यामुळे आम्ही गेलो गुहागरच्या सी

2:30ब्रिज होमस्टेमध्ये जे थेट गुहागर बीचवरच

2:33आहे आत आल्यावर बंगला बघितला आणि असं

2:37[संगीत]

2:51वाटलं कंडोलिम व्हॅगाटोर आगोंदा किंवा

2:54पणजीतल्या कुठल्यातरी बीच विलामध्ये आलेलो

2:56आहोत अगदी तसेच वाईब्स आहेत या होम

2:59स्टेजचे पण पहिलं फ्रेश होऊन आम्ही पळालो

3:03[संगीत]

3:15बीचवर मुख्य गुहागर बीचवर असलं तरी

3:18बीचच्या गजबजलेल्या भागापासून खूपच दूर

3:20आहे त्यामुळे काहीच गर्दी इथे नसते खरं तर

3:22अथांग त्याचं नाव सार्थ करतोय आणि

3:24प्रत्येक वेळी कसलीही भीती न ठेवता

3:27समुद्रातच धावतोय यावेळेस सोबत काका

3:29असल्यामुळे तो तर उधळलाच होता अजून वेदा

3:32का येत नाहीये असा विचार आमचा चालू होता

3:34कारण सेलिब्रेशनची खरी गरज तिला होती पण

3:36मला माहित नव्हतं की गेले वर्षभर जोरदार

3:40अभ्यासामुळे एक गोष्ट ती समुद्रापेक्षाही

3:43जास्त मिस करत होती ते म्हणजे तिचं पॅशन

3:46असणार जे वाद्याचं वादन समुद्राच्या

3:49गाजेच्या साथीत तिने वादन चालू केलं

3:55[संगीत]

4:04गेली अनेक वर्ष वेधा झेंबे मनापासून शिकते

4:08ती वादनात तल्लीन झाली होती आम्हाला

4:10समुद्राचाही विसर पडला आणि एक मैफलच तिथे

4:13रंगली

4:17[संगीत]

4:25[संगीत]

4:34[संगीत]

4:40तर प्रथेप्रमाणे वेळ झालेली आहे तुम्हाला

4:42विला टूर दाखवण्याची चला तर आपण आतनं

4:46बंगलो कसं आहे ते बघूयात तर असा प्रशस्त

4:49हॉल आहे यांचा लिविंग रूम एल शेप सोफा आहे

4:52आणि मागेच आपण म्हणतो ना की लॉन्च स्टाईल

4:56अशा चेअर्स आहेत निवांत वाचायला किंवा

4:59इव्हन चहा प्यायला आणि छान सजवले यांनी

5:03म्हणजे ही जुनी इस्त्री असेल किंवा

5:04सायकलचा वापर करून तयार केलेलं हे टेबल

5:06असेल किंवा मागचं असेल हे पोर्ट्रेट अख्ख

5:09केलेलं तर छोट्या छोट्या गोष्टींचा वापर

5:11करून मस्त सजवलाय त्यांनी बंगला आणि इथे

5:15डायनिंग टेबल आहे चार ते पाच लोक बसू

5:17शकतात पण खरं सांगायचं तर या डायनिंग टेबल

5:20पेक्षाही आम्हाला बाहेरचं जास्त आवडलं

5:21बाहेरचं थेट सी व्यू असणार डायनिंग टेबल

5:24आहे तिथेच आम्ही ब्रेकफास्ट जेवण इव्हन

5:26डिनर पण आम्ही तिथेच करत होतो आणि इथे

5:28छोटसं किचन आहे

5:30खरं सांगायचं तर यांचं प्रॉपर किचन आहे

5:32आणि कुक पण आहे पलीकडे तिकडूनच बनवून ते

5:35इकडे आणून देतात पण जर तुम्हाला चहा करून

5:37घ्यायचा असेल किंवा बाळासाठी काही बनवायचा

5:39असेल इंडक्शन आहे ओव्हन आहे म्हणजे

5:41तुम्हाला जर काही गोष्टी बनवायच्या असतील

5:42तर तुम्ही बनवू शकता बाळ असेल तर तुम्ही

5:44गरम भात वगैरे सुद्धा बनवून घेऊ शकता तर

5:47हे आहे किचन आणि इथूनच

5:51वरती गेल्यावरती दोन्ही बेडरूम वरती आहेत

5:53दाखवतो मी म्हटलं तसं दोन बेडरूम वरती

5:57आहेत साईज वाईज वाईज सेम आहेत

6:01ठडा एकदम रिसॉर्ट पार टाईप लुक याला आणि

6:06हा जो बेड आहे ना पण लय श्रीमंती लुक

6:09वाटतो ना हा

6:11विशेषतः जे कपल्स असतील रोमॅटिक जर स्पेंड

6:15करायचं असेल व्हेकेशन तर छान आहे म्हणजे

6:18आमच्यामध्ये अथांग झोपला होता असो चला तर

6:23या रूम नंतर इथे आहे गच्ची आणि सगळ्यात

6:27छान गोष्ट म्हणजे दोन्ही बेडरूमला कॉमन

6:29गच्ची आहे आहे तर इथे सकाळच्या वेळी येऊन

6:34बसलं की समोर समुद्र नाही का म्हणजे आपणच

6:36भगवान टाईप फील आहे फुल मस्त आहे आणि

6:41इकडूनच सेकंड बेडरूम बाय द वे दोन वेगळे

6:44एंट्रन्स आहेत बेडरूमला तर तुम्हाला वाटेल

6:46की सगळंच कॉमन कॉमन आहे का काय तर वेगळा

6:48एंट्रन्स आहे पण गच्ची कॉमन आहे आणि हे पण

6:51म्हटलं तसं की रूम सेमच आहे दोन वॉर्ड्रोब

6:53स्पेस वाईज वॉशरूम बाय द वे वॉशरूम खूप

6:56छान आहे यांचं जनरली वॉशरूम हे काय

6:58प्रेक्षणीय खळ नाही दाखवायचं पण काही काही

7:01फारच भारी असतात की आपल्याला असं वाटतं की

7:03अरे कसलं भारी वॉशरूम आहे तर वॉशरूम मध्ये

7:06आलं की डायरेक्ट नाही का असं बाली

7:10इंडोनेशिया टाईप फील आहे याला असे

7:12ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये कसे वॉशरूम असतात

7:14ओपन एअर वॉशरूम वगैरे तसा तर छान आहे

7:18स्पेसिअस आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी पण

7:21त्यांनी खूप चांगल्या केल्यात म्हणजे जे

7:23स्ट्रक्चर असेल एक एक गोष्ट मी सजवली असेल

7:26रूम खूप छान पद्धतीने सजवली आहे त्यामुळे

7:28आल्यावर तुम्हाला रूममध्ये पण तुम्हाला जर

7:31वेळ स्पेंड करायचा असेल तर छान वाटतं

7:32तुम्हाला हा संपूर्ण बंगला तुम्ही सुद्धा

7:35बुक करू शकता बुकिंग साठीचे सगळे डिटेल्स

7:38लिंक्स फोन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये

7:40दिलेले आहेत फोन वरनंही तुम्ही डायरेक्ट

7:42बुकिंग करू शकता थोडी विश्रांती घेऊन मी

7:45निघालो गुहागर जवळचं एकदम जुनं लाईट हाऊस

7:48म्हणजेच दीपस्तंभ बघायला जो आजही ऑपरेशनल

7:56आहे हे लाईट हाऊस आहे अंजनवेल या गावात जे

8:00गुहागरपासून साधारण 13 km च्या अंतरावर

8:02आहे रस्ता एकदम मस्त आहे त्यामुळे

8:04पोहोचायला अर्धा तास लागतो अंजनवेल लाईट

8:06हाऊस दुपारी तीन ते पाच या वेळेतच

8:09पर्यटकांसाठी खुल असतं याची कृपया नोंद

8:12ठेवा आत जाण्यासाठी मोठ्यांसाठी तिकीट आहे

8:14दहा रुपये तिकीट काढून दोन मजले चढून

8:17शिडीने तुम्हाला दीपस्तंभाच्या थेट आत

8:19जाता येतं जायला लय भारी वाटतं एखाद्या

8:22खुफिया बंकर मध्ये घुसल्याचा फील येतो आत

8:25गेल्यावर मुख्य दिवा आहे आणि त्याला

8:27लागूनच असलेल्या गॅलरीमध्ये तुम्ही जाऊ

8:29शकता तिथून जो काही व्ह्यू दिसतो ना तो

8:31म्हणजे लाजवाब बऱ्याच वेळी

8:34समुद्रकिनाऱ्यावरून किंवा बोटीतून

8:36आपल्याला लुकलुकणारा दीपस्तंभ दिसतो पण

8:38थेट त्या दीपस्तंभावर उभं राहून समुद्र

8:41बघण्याचा फीलच वेगळा खरं तर इथून सनसेट पण

8:43लय भारी दिसेल पण वेळेची मर्यादा

8:45असल्यामुळे संध्याकाळी पाच पर्यंतच

8:47दीपस्तंभ खुला असतो बाहेर आल्यावर आम्ही

8:49गुहागरला परत जाणार होतो पण आम्हाला समजलं

8:52की लाईट हाऊसच्याच बाजूला पाच

8:54मिनिटांच्याच अंतरावर एक डॉल्फिन पॉईंट

8:56आहे जिथे अगदी चालत चालत पाच मिनिटात

8:58पोहोचता येतं लाईट हाऊसच्या बाजूनेच

9:00त्याची पायवाट जाते गावातल्या कुठल्याही

9:02माणसाला डॉल्फिन पॉईंट विचारा ते तुम्हाला

9:04सांगतील चालत चालत तुम्ही समुद्राच्या

9:07कड्यावरतीच डायरेक्ट पोहोचता सगळीकडे

9:09क्षितजापर्यंत पसरलेला फक्त समुद्र

9:12तुम्हाला दिसतो इथून खरंच डॉल्फिन सुद्धा

9:14दिसू शकतात त्यामुळे त्याचं नाव डॉल्फिन

9:16पॉईंट आहे आम्हाला नाही दिसले मे बी

9:18दुपारची वेळ असल्यामुळे डॉल्फिन पण झोपा

9:20काढत असावेत एकदम बुरजासारखा पॉईंट

9:22असल्यामुळे फुल दिलच्या आता हे वाईब्स मी

9:24तुम्हाला सजेस्ट करेन शक्यतो चार वाजता

9:26लाईट हाऊसला या चार ते साडेचार बघून पाच

9:29चा तुम्हाला इथे येता येईल आणि सनसेट इथे

9:32बघायला पाहिजे फारच भारी दिसेल सनसेट

9:34अप्रतिम व्यू डोळ्यात साठवून मी परतलो

9:36गुहागर सोडून तिथे आणखी दोन बीच प्रसिद्ध

9:38आहेत त्यातला पहिला आहे वेळणेश्वर जो

9:41गुहागरपासून 15 km च्या अंतरावर आहेत जिथे

9:44वेळणेश्वराचं सुंदर मंदिर सुद्धा आहे आणि

9:46त्याला लागूनच समुद्रकिनारा आहे

9:48वेळणेश्वरच्याच पुढे 4 km अंतरावर आहे

9:51हेदवी बीच आणि हेदवी बीच वर असणारी

9:54प्रसिद्ध बामणघळी त्यामुळे गुहागर ट्रिप

9:56तुम्ही प्लॅन करत असाल तर गुहागर

9:58वेळणेश्वर हेदवी हे तीनही बीच तुमच्या

10:01ट्रिप मध्ये तुम्ही करायलाच पाहिजे पण हे

10:03तीनही आमचे बघून झाले होते त्यामुळे

10:05कुठलातरी वेगळा ऑफबिट बीच आपण एक्सप्लोर

10:07करूयात असं आम्हाला वाटलं आणि आम्हाला

10:09समजलं की गुहागरपासून 12 ते 13 किलोमीटर

10:12च्या अंतरावर बुधल नावाचा एक बीच आहे

10:14त्यामुळे तिथे जायचं आम्ही ठरवलं गुहागर

10:17पासून तिथे जाताना अगदी छोटा घाट ऑन द वे

10:20लागतो तिथून संपूर्ण गुहागरचा

10:21समुद्रकिनारा दिसतो फोटो काढण्यासाठी अगदी

10:24परफेक्ट पॉईंट त्यामुळे बुधला जरी गेला

10:26नाही तरी या पॉईंटला तुम्ही नक्कीच जा

10:28तिकडून अर्ध्या तासात आम्ही बुधलला

10:30पोहोचलो बुधल गावाला लागूनच तो बीच आहे

10:33त्यामुळे चित्रात दिसावं तसं हे छोटसं

10:35कौलारू घर असणार गाव आणि त्याला लागून

10:38असणारा समुद्र एखाद्या पेंटिंग प्रमाणेच

10:40हे दिसतं पण खरं सांगू एवढंच बघायला

10:43भूदलला जावं आणि परत यावं कारण तिथून जर

10:45समुद्रकिनाऱ्यावर जायचं असेल तर संपूर्ण

10:48गावातून चालत चालत तुम्हाला जावं लागतं

10:50त्यामुळे सोबत बाळ असेल किंवा वयस्कर कोणी

10:52असेल तर अवघड आहे समुद्रकिनारा खोल

10:55असल्यामुळे तिथे पाण्यात सुद्धा उतरता येत

10:57नाही आम्ही तरी तिथे दहा मिनिटात पोहोचलो

10:59मग मच्छीमारांच्या बोटी लागल्या होत्या

11:01इथे गावातल्या पोरांची क्रिकेटची मॅच पण

11:03रंगली होती खरं तर फोटो सेशन साठी किंवा

11:06शूट साठी हा स्पॉट लय भारी पण कुटुंबाने

11:09एकत्र येऊन बीच एन्जॉय करायचा असेल किंवा

11:11खेळायचा असेल पाण्यात तर हा योग्य बीच

11:13नाही फॅमिलीसाठी हा बीच मी अजिबात रेकमेंड

11:16करणार नाही त्यापेक्षा गुहागरचाच बीच

11:18कित्येक पटीने भारी आहे असो पण अशा ठिकाणी

11:21सुद्धा कोकणाची वेगवेगळी रूप बघायला

11:23मिळतात आणि संध्याकाळ आम्ही इथेही एन्जॉय

11:26केली दिवसभर भरपूर फिरून आम्ही परत

11:29पोहोचलो आमच्या सुंदर बंगल्यावर

11:31बंगल्यामध्येच कोकणी कुटुंब राहतं ते

11:33तुम्हाला अस्सल घरगुती कोकणी जेवण बनवून

11:36देत रात्रीचा बेत होता ओल्या काजूची उसळ

11:40फणसाची भाजी आमरस त्याचबरोबर जर तुम्हाला

11:44बार्बक्यू स्वतः बनवून घ्यायचे असतील तर

11:47सगळी सामुग्री व्यवस्था ते प्रोव्हाइड

11:49करतात त्यामुळे रात्री पार्टीसाठी सुद्धा

11:51हा बंगला लय भारी इतके फिरलोय आम्ही

11:54तरीसुद्धा मन भरलेलं नाही कारण गुहागर हा

11:56भागच असा आहे जितकं फिराल तितकं कमी पडेल

11:59बाय द वे तुम्हाला सुद्धा तुमचा वीकेंड

12:01असाच हॅपनिंग करायचा असेल तर सी ब्रिज

12:03विला नक्की बुक करा हा जो बंगलो आहे हा

12:06थेट गुहागर बीच वरती आहे त्याच्या सगळ्या

12:08लिंक्स कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन

12:10बॉक्स मध्ये दिलेले आहेतच असेच दर बुधवारी

12:13आपण खाण्याचे आणि फिरण्याचे इंटरेस्टिंग

12:14व्हिडिओज घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला

12:16सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब

12:18करून टाका आता भेटूयात पुढच्या बुधवारी

12:20तोपर्यंत हॅप्पी जर्नी

Recently added transcripts

Browse the whole transcript library

This transcript was generated from the captions YouTube publishes for this video. Get the transcript of any YouTube video atfreeyoutubetranscribe.com, free, unlimited, no sign-up.